# मॉक ड्रिल #
कोणत्याही एका मोठ्या घटनेला सुनियोजितपणे परंतु संभाव्यता कमीतकमी चुका करत दिलेला घटनेपूर्वीचा परिणामकारक कृती कार्यक्रम. मॉकड्रिल म्हणजे…प्रॅक्टिस,रिअर्सल, तालीम, एक प्रकारचा घटनेपूर्वीचा केलेला घटनासदृश्य सराव. मॉकड्रिल हे एखादा मोठा कार्यक्रम, सार्वत्रिक निवडणूका, मोठा प्रोजेक्ट किंवा युद्ध, त्या घटनेअगोदर केलेली घटना सदृश्य चाचपणी सरावाचा अभ्यास.
देशात प्रत्यक्ष युद्धाच्या अगोदर मॉकड्रिल हे दोन विशेष कारणासाठी घेतले जाते.

1) कमीतकमी वित्तहानी होण्यासाठी व

2) कमीतकमी जीवितहानी होण्यासाठी.

कमीत कमी वित्तहानी व्हावी यासाठी सरकारकडे व संबंधित संस्थाकडे संवेदनशील ठिकाणाची यादी असते व त्याची खबरदारी घेण्याची जबाबदारी, क्षमता व निर्णयात्मकता सुद्धा सरकारकडे असते.(उदा. संरक्षण ठिकाणे, धरणे, वीजनिर्मिती,अणुऊर्जा प्रकल्प दारुगोळा इ.इ.) कमीत कमी जीवितहानी व्हावी यासाठी मानवीवस्ती जेथे जेथे आहे तेथे तेथे मॉकड्रिल होणे हे अतिमहत्वाचे असते.

प्रत्यक्ष यद्धाप्रसंगी सैनिक हे आपापल्या नियोजनाप्रमाणे लढत असतात. मानवी वस्ती गाव शहरे महानगरे याची सर्व खबरदारी घेण्याची जबाबदारी पोलीस, निमलष्करी जवान CRPF, SRPF, होमगार्ड्स, नागरी संरक्षण दल, NGO व इतर शासकीय यंत्रणा इ. इ. यांच्याकडे असते.

लोकसंख्या व मानवी वस्त्या शहरे व युद्धप्रसंगी घडणाऱ्या एकामागोमाग भयानक घटना यांच्या तुलनेत शासकीय यंत्रणा तुटपुंजी ठरत जाते. प्रत्यक्ष युद्ध प्रसंगी मानवी वस्तीवर जीवित हानी पोहोचविण्यासाठी शत्रू राष्ट्र हवाई आक्रमण करत असतो. हवाई आक्रमणात बॉम्बर विमाने किंवा क्षेपणास्त्रे टाकून प्रचंड हाहाकार माजवत असतो.

अशा या अचानक आणि भ्याड हमल्यात नागरिक प्रचंड भयभीत होत असतात. एकच मोठा हाहाकार व गोंधळ होत असतो. अशा या शत्रूच्या हवाई आक्रमण प्रसंगी कोणती व कशी काळजी घ्यावी की जेणे करून कमीत कमी आपली जीवित हानी होईल यासाठी छोट्या मानवी वस्ती पासून ते मोठ्या महानगरातील प्रत्येक नागरिकांमध्येच प्रत्यक्ष प्रसंगी आहे त्या परिस्थितीत तोंड देण्याचा सराव निर्माण करणे म्हणजेच मॉक ड्रिल करणे हे महत्वाचे असते.

थोडक्यात युद्धाप्रसंगी हवाईआक्रमण अगोदर, हवाई आक्रमणवेळी व हवाई आक्रमणानंतर म्हणजेच 1) धोक्याच्या अगोदर, 2)प्रत्यक्ष धोक्यावेळी व 3) धोका टळल्यावर. नागरिकांनी नागरिकांची शासकीय यंत्रनेबरोबर खांद्याला खांदा लावून देशसेवेसाठी केलेली प्रामाणिक कर्तव्यता.
मॉक ड्रिल अथवा सराव कोणता असावा.


धोक्याच्या अगोदर : शत्रू राष्ट्र हवाई हमला हा दोन भागात करत असतो एक दिवसा व एक रात्री. यावेळी नागरिकांना धोका पूर्व सूचित करण्यासाठी प्रभावी साधन म्हणजे सायरान (भोंगा) वाजवले जाते. सायरान दोन प्रकारे वाजवले जाते धोका असताना व धोका टळल्यावर. सायरान च्या नियमांचे तंतोतंत पालन करणे हे सर्वांचे कर्तव्य असते. सायरान वाजल्यावर वरच्या मजल्यावरच्या नागरिकांनी तळघरातील रूम मध्ये किंवा सर्वात खालच्या हॉल मध्ये कोणतीही चेंगराचेंगारी, कोणाला दुखापत होणार नाही अशा प्रकारे सुरक्षितपणे एकत्रित यावे. दरम्यान जिना उतरताना कमी वेळेत जास्तीत जास्त कशी हालचाल होईल याचा सराव महत्वाचा. क्षण मिनिटात बिल्डिंग खाली करून सुरक्षित मोकळ्या जागेत कसे जमावे याचा सराव महत्वाचा. तसेच रात्रीच्या वेळी सायरान वाजल्यावर ब्लॅक आऊट करून आपापली रात्रीच्या अंधारात राहण्याची सहजता, आणि मानसिकता तयार करावी

2) सर्व दवाखान्यात विशेष बेडची व डॉक्टर्स पथकाचे व्यवस्थापन करून ठेवणे.

3) मानवी वस्ती मधून दवाखान्यात रुग्ण पोहोच करण्यासाठी जागोजागी ऍम्ब्युलन्स व दळणवळण व्यवस्था तयार असणे गरजेचे असते. रक्तपुरवठा पुरवण्यासाठी पुरेश्या रक्तपेढ्या तयार असणे गरजेचे. रक्तदाता यादी तयार असणे गरजेचे.

4) जागोजागी वस्ती अथवा बिल्डिंग मध्ये प्रशिक्षित स्वयंसेवकाचे पथक तयार असणे आवश्यक.

5) प्रत्येकाने आपापल्या घरातील ससाधणाचा काटकसरीने वापर करावा. (पाणी वीज अन्न इ. इ.)

6) अति महत्वाचे सर्व नागरिकांनी आपापली मनोवस्था स्थिर ठेवावी दुसऱ्यांनासुद्धा धीर व विश्वास देण्याचा सतत प्रयत्न करत राहावा.

7) मोकळ्या जागा, मैदान इत्यादी सुरक्षित ठिकाणे नागरिकांना सुचवावी व विभागवर जागेचे नियोजन करून ठेवावे.

8) विभागवार तरुणांची पथके तयार करून रुग्णांना घटना स्थळपासून मैदानात आणण्याचा सराव त्या साठी लागणारी दोरखंड,आग विझवण्यासाठीचे पाणी वाळू इ. इ.प्रथमोपचार प्रशिक्षण सराव इ. इ.


) धोक्याच्या वेळी : युद्धा च्या वेळेस बॉम्ब वर्षाव, क्षेपणास्त्र पडत असतात एखाद्या ठिकाणी प्रचंड गोंधळ होत असतो नागरिक प्रचंड घाबरलेली असतात अशा वेळेस सर्वात प्रथम सर्वांनाच धीर देऊन मदत करण्यासाठी रुग्णांना लवकरात लवकर हॉस्पिटल मध्ये कसा पोहोच होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा.

2)विनाकारण अफ़वा पसरावून लोकांमध्ये भीती पसरवू नये किंवा इतरांची मनोवस्था डामाडोल करु नये याचे भान ठेवावे.

3) संबंधित स्थानिक तरुण पथकाने शासकीय यंत्रणनाना पूर्ण सहकार्य करून सर्वांनाच मदत, मदत व आणि फक्त मदत करणे व आपले कर्तव्य पाळणे गरजेचे असते.

4) युद्धाच्या वेळी भेदारलेली जनता विशेषतः महानगरातून गावाकडे सुरक्षित ठिकाणी येण्याचा कल वाढत असतो अशा स्थलानंतर करताना स्थानिक शासकीय यंत्रनेच्या नियमांचे पालन करून त्यांना पूर्ण सहकार्याने मदत करणे आवश्यक.

5) कथित अफरा तफरी होण्याची शक्यता असल्याने वेळीच अशा टोळक्याना पायबंद घालावा अगर यंत्रनेला ताबडतोब कळवावे.


) धोका टळल्यावर :

1) पुन्हा एकदा आपापली कौटुंबिक रसद भरून ठेवावी.

2) जो पर्यंत युद्ध समाप्ती जाहीर होत नाही तॊ पर्यंत नागरिकांनी अलर्ट असणे अति महत्वाचे असते.
अशाप्रकारे युद्धप्रसंगी येणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी प्रत्येक जागरूक नागरिकांना जितका मॉकड्रिलचा अभ्यास महत्वाचा तेवढाच युद्धप्रसंगी सतत पुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरे कसे जायचे व टिकून कसे राहायचे याचे भान असणे हेही मॉकड्रिलचा एक भाग व त्याची जनजागृती करणे हासुद्धा मॉकड्रिलचाच एक भाग होय.
जयहिंद श्री.फासगे सुभाष नारायण, वरवंड,ता.दौंड,जि.पुणे (नागरी संरक्षण दल, पूर्व सदस्य)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *